मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  DLS पद्धतीचे जनक फ्रँक डकवर्थ यांचे निधन, डकवर्थ-लुईस नियमाचा वापर पहिल्यांदा कधी झाला? जाणून घ्या

DLS पद्धतीचे जनक फ्रँक डकवर्थ यांचे निधन, डकवर्थ-लुईस नियमाचा वापर पहिल्यांदा कधी झाला? जाणून घ्या

Jun 26, 2024 10:57 AM IST

Frank Duckworth Death : डकवर्थ लुईस स्टर्न (DLS) पद्धत सुरू करणाऱ्या डकवर्थ लुईस यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले आहे.

DLS पद्धतीचे निर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन, डकवर्थ-लुईस नियमाचा वापर पहिल्यांदा कधी झाला? जाणून घ्या
DLS पद्धतीचे निर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन, डकवर्थ-लुईस नियमाचा वापर पहिल्यांदा कधी झाला? जाणून घ्या

क्रिकेटला डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) नियम देणारे इंग्लिश सांख्यिकीशास्त्रज्ञ फ्रँक डकवर्थ यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. 'ESPNcricinfo.com'च्या रिपोर्टनुसार, डकवर्थचा मृत्यू २१ जून रोजी झाला. डकवर्थ यांनी त्यांचे सहकारी सांख्यिकीशास्त्रज्ञ टोनी लुईस यांच्यासमवेत DLS पद्धत विकसित केली. हा नियम पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यांसाठी वापरला जातो.

ट्रेंडिंग न्यूज

१९९७ मध्ये पहिल्यांदा क्रिकेट सामन्यात DLS पद्धत लागू करण्यात आली. ४ वर्षांनंतर, म्हणजे २००१ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (ICC) याला हिरवा सिग्नल दिला.

फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस यांच्या निवृत्तीनंतर स्टीव्हन स्टर्न या ऑस्ट्रेलियन सांख्यिकीतज्ज्ञाने या पद्धतीत काही सुधारणा केल्या.

या कारणास्तव या नियमाला डकवर्थ-लुईस-स्टर्न असे नाव देण्यात आले. डकवर्थ आणि लुईस यांना जून २०१० मध्ये मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (MBE) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डकवर्थ-लुईस पद्धत जेव्हा पाऊस किंवा इतर कारणांमुळे सामना सुरू ठेवण्यास अडथळा निर्माण होतो तेव्हा अंमलात आणली जाते. वेळ वाचवण्यासाठी ओव्हर्स कमी केले जातात, म्हणून DLS नियम लागू करताना अनेक पैलू विचारात घेतले जातात. जसे एखाद्या संघाच्या किती विकेट्स शिल्लक आहेत, किती षटके झाली आहेत आणि राहिली आहेत. तसेच, इतर अनेक पैलू देखील विचारात घेतले जातात.

फ्रँक डकवर्थ यांनी १९६१ मध्ये लिव्हरपूल विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पुढील शिक्षण घेतले. फ्रँकने १९६५ मध्ये धातुशास्त्रात पीएचडी पदवीही प्राप्त केली. त्यांनी अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेसाठी सल्लागार सांख्यिकीशास्त्रज्ञ म्हणून काम केले आणि फ्रँक २०१४ मध्ये निवृत्त झाले.

टी-२० वर्ल्डकप २०२४