मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rohit Sharma : शतक हुकलं म्हणून काय झालं, रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पिसं काढली, ४१ चेंडूत ठोकल्या ९२ धावा

Rohit Sharma : शतक हुकलं म्हणून काय झालं, रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पिसं काढली, ४१ चेंडूत ठोकल्या ९२ धावा

Jun 24, 2024 09:34 PM IST

Rohit Sharma Smashed 92 runs in 41 balls : टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये आज (२४ जून) भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. सेंट लुसियाच्या डॅरेन सॅमी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.

Rohit Sharma : शतक हुकलं म्हणून काय झा��ं, रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पिसं काढली, ४१ चेंडूत ठोकल्या ९२ धावा
Rohit Sharma : शतक हुकलं म्हणून काय झालं, रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पिसं काढली, ४१ चेंडूत ठोकल्या ९२ धावा (PTI)

भारतीय कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 विश्वचषक २०२४ मधील सुपर ८ सामन्यात आपला स्फोटक फॉर्म दाखवला. सलामीला आलेल्या रोहितने पहिल्या ५ चेंडूत केवळ ६ धावा केल्या. मात्र यानंतर त्याने गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. रोहितने मिचेल स्टार्कविरुद्ध डावाच्या तिसऱ्या षटकात ४ षटकार आणि १ चौकार लगावला. या षटकात स्टार्कने २९ धावा दिल्या.

ट्रेंडिंग न्यूज

भारत आणि ऑस्ट्रेलिया सुपर ८ चा सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर रोहित शर्माने तुफानी फलंदाजी केली.

रोहित ४१ चेंडूत ९२ धावा करून बाद झाला. त्याला मिचेल स्टार्कने बोल्ड केले. रोहित ११व्या षटकात बाद झाला.

१९ चेंडूत अर्धशतक

तत्पूर्वी या सामन्यात रोहित शर्माने १९ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे सर्वात जलद अर्धशतक आहे. रोहितने भारतीय डावाच्या ५व्या षटकातच अर्धशतक झळकावले. या T20 विश्वचषकातील हे सर्वात जलद अर्धशतक देखील आहे. रोहितने यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध २२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. रोहित शर्माने ५० धावा पूर्ण केल्या तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या ५२ धावा होती. यामध्ये एक वाइड आणि एक पंतच्या बॅटमधून एक रन आला होता.

T20 विश्वचषकातील भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक

युवराज सिंग- १२ चेंडूत विरुद्ध इंग्लंड 

केएल राहुल- १८ चेंडू विरुद्ध स्कॉटलंड

रोहित शर्मा- १९ चेंडू विरुद्ध ऑस्ट्रेलिया

युवराज सिंग- २० चेंडू विरुद्ध ऑस्ट्रेलिया

सूर्यकुमार यादव- २३ चेंडू विरुद्ध  झिम्बाब्वे

रोहित शर्माचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० षटकार

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० षटकार मारणारा रोहित शर्मा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. या सामन्यापूर्वी रोहितच्या नावावर १९५ षटकार होते. मिचेल स्टार्कविरुद्ध ४ षटकार मारल्यानंतर त्याने पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर ५व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. या षटकाराचे अंतर १०० मीटर होते. चेंडू स्टेडियमच्या छतावर पडला. भारतीय कर्णधाराच्या कारकिर्दीतील हा १५७ वा सामना आहे. तसेच तो सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे.

रोहितनंतर मार्टिन गप्टिलच्या नावावर सर्वाधिक १७३ षटकार आहेत. जोस बटलर १३७ षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४