मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rashid Khan : राशीद आणि ब्रायन लारा यांची वेलकम पार्टीत भेट, दोघांमध्ये काय संवाद झाला? जाणून घ्या

Rashid Khan : राशीद आणि ब्रायन लारा यांची वेलकम पार्टीत भेट, दोघांमध्ये काय संवाद झाला? जाणून घ्या

Jun 25, 2024 04:39 PM IST

Rashid Khan Brian Lara : किंग्सटाउनच्य अर्नोस व्हॅले ग्राउंडवर झालेला हा सामना अनेक वर्षे स्मरणात राहील. रोलर कोस्टरप्रमाणे चढ-उतारांनी भरलेला सामना कधी बांगलादेशकडे तर कधी अफगाणिस्तानच्या पारड्यात झुकलेला वाटायचा.

राशीद खान आणि ब्रायन लारा यांची वेलकम पार्टीत भेट, दोघांमध्ये काय संवाद झाला? जाणून घ्या
राशीद खान आणि ब्रायन लारा यांची वेलकम पार्टीत भेट, दोघांमध्ये काय संवाद झाला? जाणून घ्या

बांगलादेशचा पराभव करून अफगाणिस्तानचा संघ २०२४ टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान भावूक झाला. उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये जल्लोषाचे वातावरण असेल, असे राशिद खानने सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

तसेच, “ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. मी ब्रायन लाराला वचन दिले होते की मी तुमच्या विश्वासावर खरा उतरेन”.

किंग्सटाउनच्य अर्नोस व्हॅले ग्राउंडवर झालेला हा सामना अनेक वर्षे स्मरणात राहील. रोलर कोस्टरप्रमाणे चढ-उतारांनी भरलेला सामना कधी बांगलादेशकडे तर कधी अफगाणिस्तानच्या पारड्यात झुकलेला वाटायचा. लो स्कोअरिंग गेम, पावसाचा अडथळा आणि डकवर्थ लुईसचा नियम यामुळे सामन्याचा थरार शेवटपर्यंत टिकून होता.

टी-20 विश्वचषक २०२४ सुरू होण्यापूर्वी वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लारा याने अफगाणिस्तान टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचेल, अशी भविष्यवाणी केली होती, या भविष्यवाणीवर अनेकांना आश्चर्य वाटले होते, मात्र हा चमत्कार करणाऱ्या संघाचा कर्णधार राशिद खान याने आश्वासन दिले होते. तो त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवेन.

राशिदने आपले वचन पूर्ण केले आणि अफगाणिस्तानने बड्या संघांना मागे टाकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तानच्या विजयासह ऑस्ट्रेलिया विश्वचषकातून बाहेर झाला. अफगाणिस्तानशिवाय भारत, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

तालिबानचा ताबा आणि युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या या देशासाठी हे मोठे यश आहे, ज्याची इतिहासाच्या पानात नोंद झाली आहे. ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान म्हणाला, "उपांत्य फेरी गाठणे हे आमच्यासाठी स्वप्न पूर्ण झाले आहे. जेव्हा आम्ही न्यूझीलंडला पराभूत केले, तेव्हा हा आत्मविश्वास वाढू लागला. एकच व्यक्ती आहे ज्याने सांगितले होते, की आम्ही उपांत्य फेरी गाठू शकतो. आणि तो ब्रायन लारा होता.

आम्ही त्यांना बरोबर सिद्ध केले. जेव्हा आम्ही त्यांना वेलकम पार्टीत भेटलो तेव्हा मी त्यांना सांगितले की आम्ही तुमची भविष्यवाणी खरी करून दाखवू.”

अफगाणिस्तानच्या कर्णधाराने पुढे सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये जल्लोषाचे वातावरण असेल. तो म्हणाला, "आमच्यासाठी ही मोठी उपलब्धी आहे. आम्ही १९ वर्षांखालील स्तरावर ती कामगिरी केली आहे, पण या स्तरावर नाही. देशात काय वातावरण असेल हे मी वर्णन करू शकत नाही. आम्हाला उपांत्य फेरी गाठायची होती. देशवासीयांना हे पाहता यावे यासाठी कोणत्याही किमतीत आम्हाला सामना जिंकायचा होता." आनंद देऊ शकतो."

 

टी-२० वर्ल्डकप २०२४