मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kalyan News : कल्याणमध्ये हिट अँड रन; भरधाव जीपने इंजिनीअरिंगच्या २ तरुणींना उडवले

Kalyan News : कल्याणमध्ये हिट अँड रन; भरधाव जीपने इंजिनीअरिंगच्या २ तरुणींना उडवले

Jun 25, 2024 11:55 PM IST

Kalyanaccident : दुचाकीला धडक दिल्यानंतर जीप चालक तेथून पसार झाला. या घटनेत दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

क भरधाव जीपने इंजिनीअरिंगच्या २ तरुणींना उडवले
क भरधाव जीपने इंजिनीअरिंगच्या २ तरुणींना उडवले

पुण्यातील पोर्शे कार अपघात व त्यानंतर नागपूरमधील घटनेनंतर आता कल्याणमध्ये भरधाव जीपने दोन तरुणींना उडवले आहे. कल्याणच्या रिंग रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने एका दुचाकीला धडक दिली. कल्याणमधील हिट अँड रनच्या केसमध्ये भरधाव जीपने दुचाकीवरून जात असलेल्या दोन तरुणींना धडक दिली. दुचाकीला धडक दिल्यानंतर जीप चालक तेथून पसार झाला. या घटनेत दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

सेजल भानुशाली व समीक्षा भानुशाली असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणींची नावे आहेत. दुचाकीला जीपने उडवल्यानंतर अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. कल्याणमधील रिंग रोडवर हा अपघात झाला. या अपघातानंतर गाडी घेऊन चालक पसार झाला. या अपघातात दुचाकीस्वार दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत.

जखमी झालेल्या दोन्ही तरुणी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनी आहेत. घरी परतत असताना ही घटना घडली. या अपघात प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी जीप चालकाचा शोध सुरु केला आहे.

कल्याण पश्चिमेकडील रिंग रोड येथील गांधारी पूलाजवळ एका भरधाव जीप चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन तरुण विद्यार्थिनी जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

रिंग रोडचे काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहेत. त्यात काही स्टंटबाज धूम स्टाईल वाहनचालकांमुळे या रिंग रोडवर अपघातांचा प्रमाण वाढले आहे.

पुण्यात पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला अखेर जामीन -

पुण्यातील कल्याणीगर पोर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट आली आहे. मुंबई हाय कोर्टाने अल्पवयीन आरोपीला दिलासा देत जामिनावर मुक्त करण्याचे आदेश न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने दिले आहेत. एकदा जमीन दिल्यावर पुन्हा त्याला कोठडीत ठेवणे म्हणजे बेकायदेशीर कृत्य असल्याचे सांगत कोर्टाने त्याला बालसुधारगृहाच्या कोठडीतून सोडण्याचे आदेश दिले आहेत. 

या प्रकरणी मुलाची आत्या पूजा जैननं यांनी हेबियस कॉर्पसअंतर्गत हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका हायकोर्टाने स्वीकारली आहे. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून अल्पवयीन आरोपीला तातडीने सोडण्याचे आदेश दिले आहेत..

 

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग