मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs SA Final : कोहली शतक ठोकणार, भारत टी-20 विश्वचषक जिंकणार... फायनलपूर्वी दिग्गजाने मोठी भविष्यवाणी केली

IND vs SA Final : कोहली शतक ठोकणार, भारत टी-20 विश्वचषक जिंकणार... फायनलपूर्वी दिग्गजाने मोठी भविष्यवाणी केली

Jun 29, 2024 10:11 AM IST

T20 World Cup 2024 Final Prediction : टी-20 विश्वचषक २०२४ च्या फायनलपूर्वी, इंग्लंडच्या माजी फिरकीपटूने मोठी भविष्यवाणी केली आणि म्हटले की टीम इंडिया वर्ल्डकप जिंकेल आणि कोहली शतक झळकावेल.

IND vs SA Final : कोहली शतक ठोकणार, भारत टी-20 विश्वचषक जिंकणार... फायनलपूर्वी दिग्गजाने मोठी भविष्यवाणी केली
IND vs SA Final : कोहली शतक ठोकणार, भारत टी-20 विश्वचषक जिंकणार... फायनलपूर्वी दिग्गजाने मोठी भविष्यवाणी केली (Surjeet Yadav)

IND vs SA Final, T20 World Cup 2024 :  भारतीय चाहते आयसीसी ट्रॉफीची एक दशकाहून अधिक काळ वाट पाहत आहेत. मेन इन ब्लूने शेवटची ICC ट्रॉफी २०१३ मध्ये जिंकली होती. त्यावेळी भारताने धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

ट्रेंडिंग न्यूज

तर सुमारे ७ महिन्यांपूर्वी टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी गमावली होती, वनडे वर्ल्डकप २०२३ मध्ये भारताचा पराभव झाला होता. परंतु आता संघाला २०२४ टी-20 विश्वचषकाद्वारे पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. आज (२९ जून) टीम इंडियाचा T20 विश्वचषक २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामना होणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेतेपदाचा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज मॉन्टी पानेसरने मोठी भविष्यवाणी केली आहे. टीम इंडिया विश्वचषकाचे जेतेपद पटकावणार असून कोहली फायनलमध्ये शतक करेल, असे त्याने सांगितले आहे.

'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना माजी इंग्लिश फिरकीपटू म्हणाला, "भारत टी20 विश्वचषक २०२४ ची फायनल जिंकेल आणि विराट कोहली शतक झळकावेल."

कोहलीचा सध्या खराब फॉर्मात

टी-20 वर्ल्ड कप २०२४ मध्ये विराट कोहली आतापर्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. विश्वचषकापूर्वी खेळल्या गेलेल्या IPL २०२४ मध्ये कोहलीची बॅट जोरात बोलली होती. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने स्पर्धेत ६१.७५ च्या सरासरीने आणि १५४.६९ च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने ७४१ धावा केल्या.

मात्र, कोहलीला त्याचा आयपीएल फॉर्म वर्ल्ड कपमध्ये राखता आला नाही. टीम इंडियाने स्पर्धेतील पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळला, ज्यामध्ये त्याला केवळ १ धावा करता आली. त्यानंतर कोहलीला आपली लय परत मिळवता आली नाही.

मात्र, आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात चाहत्यांना त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीत कोहली केवळ ९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. आता अंतिम फेरीत तो संघासाठी कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

WhatsApp channel