मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 World Cup : पुढचा टी-20 वर्ल्डकप कधी? कोणत्या देशात रंगणार स्पर्धा, पात्र संघांसह संपूर्ण माहिती पाहा

T20 World Cup : पुढचा टी-20 वर्ल्डकप कधी? कोणत्या देशात रंगणार स्पर्धा, पात्र संघांसह संपूर्ण माहिती पाहा

Jun 30, 2024 04:44 PM IST

T20 World Cup 2026 : टीम इंडियाने २०२४ चा टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. भारत चॅम्पियन बनल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मानेही या फॉरमॅटला अलविदा केला. पण पुढील T20 विश्वचषक कुठे खेळला जाणार आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

T20 World Cup : पुढचा टी-20 वर्ल्डकप कधी? कोणत्या देशात रंगणार स्पर्धा, पात्र संघांसह संपूर्ण माहिती पाहा
T20 World Cup : पुढचा टी-20 वर्ल्डकप कधी? कोणत्या देशात रंगणार स्पर्धा, पात्र संघांसह संपूर्ण माहिती पाहा (BCCI-X)

भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०२४ चा टी-20 विश्वचषक जिंकला. भारताने विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. हा ९ वा टी-20 विश्वचषक होता. यासोबतच चाहत्यांना आता पुढील टी-२० विश्वचषक कधी खेळवला जाईल हे जाणून घ्यायचे आहे. आता पुढील टी-विश्वचषक कधी होणार आहे, याची माहिती येथे जाणून घेऊ.

ट्रेंडिंग न्यूज

पुढील T20 विश्वचषक कधी होणार?

पुढचा T20 वर्ल्ड कप २०२६ मध्ये खेळवला जाणार आहे. ICC ने २०२६ च्या T20 विश्वचषकासाठी फेब्रुवारी ते मार्चची विंडो दिली आहे. या विश्वचषकातही एकूण २० संघ सहभागी होणार आहेत.

पुढील T20 विश्वचषक कोठे खेळवला जाईल?

पुढील विश्वचषक म्हणजेच २०२६ चा टी-20 विश्वचषक भारत आणि श्रीलंकेत खेळवला जाईल. दोन्ही देश संयुक्तपणे याचे आयोजन करणार आहेत. २०२४ T20 विश्वचषकातील सुपर-८ संघ २०२६ च्या T20 विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत.

यजमान असल्यामुळे भारत आणि श्रीलंका वर्ल्डकपचा भाग असतील. २०२६ टी-२० विश्वचषकातील बहुतांश सामने भारतात खेळवले जातील. या जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचा संघही भारतात येणार आहे.

T20 विश्वचषक २०२६ भारत आणि श्रीलंकेमध्ये आयोजित केला जाणार आहे. हा वर्ल्डकप फेब्रुवारीमध्ये सुरू होऊ शकते. T20 विश्वचषक स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये १२ जण पात्र ठरले आहेत.

तर ८ संघ पात्रता फेरीतून येतील. २० संघांमध्ये एकूण ५५ सामने खेळवले जाणार आहेत. अजून वेळापत्रक जाहीर झालेले नाही.

टी-20 विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले देश

भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, यूएसए, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आयर्लंड आणि पाकिस्तान.

WhatsApp channel