मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीनंतर आता निलेश साबळे करतोय ‘हे’ काम! पाहा व्हिडीओ...

अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीनंतर आता निलेश साबळे करतोय ‘हे’ काम! पाहा व्हिडीओ...

Jun 28, 2024 12:04 PM IST

निलेश साबळे ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा नवा शो घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता याच शोमध्ये तो आणखी एक गोष्ट स्वतःहून हाताळताना दिसला आहे.

अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीनंतर आता डॉ. निलेश साबळे करतोय ‘हे’ काम!
अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीनंतर आता डॉ. निलेश साबळे करतोय ‘हे’ काम!

अभिनय,लेखन,दिग्दर्शन आणि निर्मिती अशा सगळ्याच क्षेत्रात आपला जलवा दाखवणाऱ्या डॉ. निलेश साबळे याने नेहमीच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमानंतर आता डॉ. निलेश साबळे याने‘हसताय ना?हसायलाच पाहिजे!’या नावाचा नवा शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या शोच्या सेटवर आता निलेश साबळे आणखी एक काम करताना दिसला आहे. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’च्या सेटवरून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये निलेश साबळे एक भन्नाट आणि वेगळं काम करताना दिसला आहे. निलेश साबळे ���क्क भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांचा मेकअप करताना दिसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘हसताय ना? हसायला पाहिजे!’ असा प्रश्न विचारत निलेश साबळे याने गेली १० वर्ष महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आणि घरात हक्काचं स्थान पटकावलं आहे. आता ‘चला हवा येऊ द्या’ हा त्याचा गाजलेला शो बंद झाला असला, तरी निलेश साबळे ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा नवा शो घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता याच शोमध्ये तो आणखी एक गोष्ट स्वतःहून हाताळताना दिसला आहे. नुकताच या शोच्या सेटवरून एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आता तो मेकअपमॅन बनून कलाकारांचा मेकअप करताना दिसला आहे. प्रेक्षकही त्याच्या या कलेचं कौतुक करत आहेत.

Viral Video: सुजलेले पाय, रक्ताळलेल्या जखमा आणि लसणाची मसाज; ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा नक्की झालंय तरी काय?

निलेश साबळे करतोय ‘हे’ काम!

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमाच्या सेटवरून समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये डॉ. निलेश साबळे हा भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांचा मेकअप करताना दिसत आहे. हातात पेन्सिल घेऊन तो भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांना मिशा काढताना दिसला आहे. ‘मनोरंजन हे असं क्षेत्र आहे... ज्यातलं सगळंच मला आवडतं...’ असं कॅप्शन देत डॉ. निलेश साबळे याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

निलेशचे चाहतेही झाले खुश!

निलेश साबळे याच्या अभिनयाचे, लेखनाचे आणि निर्मितीचे नमुने आपण आजवर पहिलेच आहेत. यासोबतच तो एक उत्तम डॉक्टरदेखील आहे. त्याने प्रत्येक क्षेत्रात स्वतःची हक्काची जागा तयार केली आहे. प्रेक्षकांच्या मनातही त्याने आपली हक्काची जागा बनवली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपल्यानंतर म्हणजेच ऑफ एअर गेल्यानंतर निलेश साबळे ब्रेक घेणार असल्याची चर्चा रंगली होती. स्वतः निलेश साबळे याने देखील आपण तब्येतीच्या कुरबुरीमुळे ब्रेक घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र, त्याने नव्या कार्यक्रमाची घोषणा करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

टी-२० वर्ल्डकप २०२४