मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Flying Insects: लाईट लावताच पावसाळी उडणारे किडे घरात येतात का? सुटका देतील हे सोपे उपाय

Flying Insects: लाईट लावताच पावसाळी उडणारे किडे घरात येतात का? सुटका देतील हे सोपे उपाय

Jun 27, 2024 10:41 PM IST

Monsoon Tips: पावसाळ्यात खिडक्या- दरवाजे उघडताच बारीक किडे आणि कीटक घरात शिरतात. त्यांना घराबाहेर काढणे खूप अवघड असते. या टिप्स उपयोगी पडते.

पावसाळी किड्यांपासून सुटका मिळवण्यासाठी टिप्स
पावसाळी किड्यांपासून सुटका मिळवण्यासाठी टिप्स

Tips to Get Rid of Flying Insects Attracted to Light: पावसाळा आपल्यासोबत अनेक समस्याही घेऊन येतो. या समस्या केवळ आरोग्याशी संबंधित नाहीत तर घराच्या स्वच्छतेशीही संबंधित आहेत. या ऋतूत पावसाळी कीटकांची दहशत बहुतेक घरातील प्रत्येक स्त्रीसाठी त्रासाचे प्रमुख कारण असते. पावसाळ्यात खिडक्या, दारे उघडताच बारीक किडे आणि कीटक घरात शिरतात. त्यांना घराबाहेर काढणे खूप अवघड असते. या पावसाळी कीटकांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हीही प्रभावी घरगुती उपाय शोधत असाल तर हे उपाय तुम्हाला मदत करू शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

पावसाळी कीटक आणि किड्यांपासून सुटका मिळवण्यासाठी टिप्स

घराच्या स्वच्छतेची काळजी घ्या

पावसाळी कीटक आणि किडे घरात प्रवेश करू नयेत म्हणून घर स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. हा उपाय करण्यासाठी पावसाळ्यात एक चतुर्थांश बादली पाण्यात एक लिंबू आणि १ कप व्हिनेगर मिक्स करा. आता हे द्रावण एका कापडावर लावून घराच्या खिडक्या आणि दरवाजे स्वच्छ करा. या कापडाने खोलीतील बल्ब आणि ट्यूबलाईट स्वच्छ करा. हा उपाय केल्याने कीटक आणि पावसाळी किडे घरात येणार नाहीत.

ब्लॅक स्क्रीन

घराच्या खिडक्या आणि जाळीदार दरवाजांवर काळे स्क्रीन लावल्यास हलक्या किडींपासून ही सुटका मिळते. खिडक्या- दरवाजांवर स्क्रीन लावल्याने घराला बाहेरचा प्रकाश दिसत नाही आणि कीटक प्रकाशाकडे आकर्षित होत नाहीत.

बेकिंग सोडा स्प्रे

कीटक दूर करण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोडा एकत्र करून द्रावण तयार करून स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यावे. कीटकांवर हे द्रावण फवारल्यास कीटकही निघून जातात.

कडुलिंबाचे तेल

आयुर्वेदानुसार कडुनिंबाचे तेल पावसाळ्याच्या दिवसात किडींपासून घराचे रक्षण करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. हा उपाय करण्यासाठी कडुनिंबाचे तेल घरात शिंपडावे.

एअर फ्रेशनर

प्रकाशाकडे आकर्षित होणारे कीटक आणि किडे टाळण्यासाठी घरीच नैसर्गिक एअर फ्रेशनर तयार करा. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी भरून त्यात १-२ चमचे बेकिंग सोडा, निलगिरी, सिट्रोनेला इसेंशियल ऑइल आणि लिंबाचा रस मिसळावा. आता या सर्व गोष्टी नीट मिक्स करून स्प्रे बॉटलमध्ये भरून घरातील दिव्यांभोवती फवारणी करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel